BJP Candidate List पुण्याच्या भाजपची उमेदवार यादी फायनल; अनेकांचा पत्ता कट

BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल

राज्यात महापालिका निवडणुकीच्या बिगुलानंतर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारांना अर्ज भरणे, मुलाखती देणे, मतदारसंघातील जनसंपर्क करणे आणि पक्षीय तपासण्या पार पाडणे यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निवास्थस्थान वर्षावर पुण्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांचे नाव फायनल केले जाणार आहे.

उमेदवारांचे नाव अंतिम करणे ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला पुण्यातील कोणते नेते उपस्थित राहणार हे समजू शकले नाही. मात्र, हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. हेच नेते वर्षावर उपस्थित असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इतर पक्षातून भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपमधील कार्यकर्ते चितेंत होते. मूळ भाजपच्या लोकांनाच उमेदवारी मिळणार नाही पण बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. त्यावर भाजपने तोडगा काढला असून जेथे 100 टक्के विजयाची खात्री आहे. त्या जागांवर मूळ भाजपच्या असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.