राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ८००० शिक्षकांची भरती; आधी होणार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षकांच्या बदल्या आता जूनपूर्वी होणार
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्क्यांप्रमाणे सुमारे आठ हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मागवून घेतल्या जातील. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविली जाईल, असे शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांची स्थिती
- एकूण शाळा
- ६३,०००
- एकूण शिक्षक
- १.९८ लाख
- रिक्त पदे
- १५,१५८
- रिक्त भरतीचे नियोजन
- ८,०००
