मुख्यमंत्रीपदामुळेच विधानसभेत पराभव झाला; त्यावेळी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून होते

Prithviraj Chavan: .त्यावेळी बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून!

19 डिसेंबर यायला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. अमेरिकेत यादिवशी काही कागदपत्रं समोर येतील आणि जगभरात खळबळ उडेल. अनेक राजकीय नेत्यांचे स्टींग ऑपरेशन समोर येईल.

या उलथापालथीचा भारतावरही परिणाम होईल. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलेल. मराठी माणूस पंतप्रधानपदी असेल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण हे सरळमार्गी नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य राजकीय विश्लेषकांनी गांभीर्याने घेतले आहे. तर दुसरीकडे चव्हाण यांनी आता स्वपक्षातील काही नेत्यांना(Prithviraj Chavan on Congress Leaders) चांगलाच चिमटा काढला आहे.

माझ्या मतदार संघात १२ हजार बोगस मतदार आहेत. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की मतदार यादी स्पष्ट असली पाहिजे. मला पाठीमागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली मग तरी पराभव कसा झाला. निवडणूक आयोगाला यावर उपाय करणं शक्य आहे पण ते करत नाही कारण त्यांना सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.