वकिलांनी लॅपटॉप उघडला अन् धनंजय देशमुख कोर्टाबाहेर येऊन ढसाढसा रडले

Pune Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद दिसून आले होते.

मुख्य सरकारी वकील‎ अमरजितसिंह गिरासे यांनी लॅपटॉप खंडपीठाचे न्या.‎सुशील घोडेस्वार यांना दिला अन् इतके धनंजय देशमुख ढसाढसा रडत कोर्टाच्या बाहेर पडले.

पत्नी अन् भावाला रडू कोसळलं
जामिनावर ‎सुनावणी प्रसंगी मुख्य सरकारी वकील‎ अमरजितसिंह गिरासे यांनी देशमुख यांच्या ‎हत्याकांडाचे 21 व्हिडिओ खंडपीठाचे न्या सुशील घोडेस्वार यांना दाखविण्यासाठी 12‎ डिसेंबर रोजी लॅपटॉप दिला. त्यात संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे व्हिडीओ आणि फोटो होते. हा भयंकर प्रसंग पाहून पत्नी अन् भावाला रडू कोसळलं. संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख कोर्टाच्या बाहेर आले. त्यावेळी इतर सहकार्यांनी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला.

कराड फोनवरून‎ मारेकऱ्यांना सूचना देत होता
संतोष देशमुख यांनी गावातील युवकांचा ‎रोजगार जाईल म्हणून यास विरोध केला. आपल्या‎ मागणीआड येणारास आडवा करा, असं कराड याने‎ घुलेला सांगितले. त्यानंतर देशमुखला उमरी‎ टोल नाक्यावरून उचललं.‎ देशमुख यांच्या हत्येच्या वेळी कराड आणि घुले‎ यांच्यात संवाद सुरू होता. कराड फोनवरून‎ मारेकऱ्यांना सूचना देत होता. हा पुरावा गुन्हे अन्वेषण‎विभागाने जमा केल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे.