Pune महाराष्ट्राचे व देशाचे ज्यष्ठ नेते शरद पवारांचा आज वाढदिवस महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला त्यांची गरज आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी केले. सोबतच, त्यांच्यासाठी सर्व पक्ष, प्रसंगी आमचे विरोधकही त्यांना राज्यसभेत आणण्यासाठी मदत करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होत आहे. त्यानंतर शरद पवार पुन्हा राज्यसभेवर येणार का, यासंदर्भातल्या चर्चांना उधाण आले आहे.
गुरुवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध पक्षांचे खासदार, राज्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. दरवर्षी साधारणपणे संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत असतात. अनेक लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येत असतात.
त्यापैकी 5 दशकांहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरत आलं आहे.
ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो.
पवारांचा राजकीय काळ हा महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेणं आवश्यक आहे.
शरद पवारांच्या आयुष्यातल्या 9 महत्त्वाच्या राजकीय घटना वा निर्णय ज्यांचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम झाले त्या जाणून घेऊया.
