ई-चलनची कारवाई करता येणार नाही; मुख्यमंत्री मोठी घोषणा

Nagpur news bike and car Pune 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मानधन 2100 रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना होणारे वाद आणि गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे अनिवार्य करण्यात येणार आहेत. गोव्याच्या धर्तीवर हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल. बॉडी कॅमेरा नसेल तर पोलिसांना ई-चलनची कारवाई करता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. ई-चलन कारवाईत काही अधिकारी खासगी मोबाईल वापरून गैरव्यवहार करत असल्याच्या तक्रारी शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडल्या होत्या. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बॉडी कॅमेऱ्यामुळे पारदर्शकता येईल, असे स्पष्ट केले. यासोबतच, मुंबईतील दुचाकी पार्किंग समस्येवर लक्ष देण्यासाठी डीसीआरमध्ये बदल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. जुन्या ई-चलनच्या वसुलीसाठी लोकअदालत आणि ६ महिन्यांत वसूलीची नवी व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.