पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Pune news अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, शेतीच्या नुकसानाची पाहणी करून त्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे.

चौहान म्हणाले की, नुकसानाचे मूल्यांकन करताना ‘क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट’ केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास तिच्या निकषांनुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा केली जाईल.