पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रथमच बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ हे महानाट्य दि.०६ आणि ०७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते,
२५० कलाकारांसमवेत भव्य रंगमंचावर प्रसिद्ध असा जाणता राजा हे महानाट्य सादर होणार आहे. भोसरी मधील स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा मैदान, मोशी येथे हे भव्य महानाट्य मोठ्या उत्साहात संपन्न झाले या नाटकाला मोशीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मोशीकरांकडून निखिल बोऱ्हाडेनां नवी ओळख
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागातच होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमांमधून मोठी गर्दी जमवली जाते मात्र सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे निखिल बोऱ्हाडे यांनी एक वेगळा आदर्श ठेवत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब पुरंदरे लिखित 2 दिवसीय जाणता राजा या नाटकाचे भव्य आयोजन केले होते,
जाणता राजाला भरभरून प्रतिसाद मिळाला जवळपास परिसरातील 25 ते 28 हजार नागरिकांनी या नाटकाचा आनंद घेतला यामुळे निखिल बोऱ्हाडे यांना मोशीकरांच्या शंभू बाळ म्हणून नवीन उपमा देखील मिळाली.
बोऱ्हाडे हे नेहमीच सामाजिक प्रश्नांची जाण ठेवत या भागाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर भूमिका मांडताना दिसून येतात साधी राहणीमान उच्च विचार व प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे व सामाजिक व राजकीय काम पुढे करत राहणे यासाठी ते परिसरात परिचित आहेत.
जाणता राजा या नाटकाला भारतीय जनता पार्टीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, माजी महापौर राहुलदादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, सौ.पूजाताई महेशदादा लांडगे,पुणे उद्योजक नवीनजी नायडु, मा.श्री.हेमंतराव हरहरे परिसरातील आजी-माजी नगरसेवक गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
