पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची महागर्दी

Pune आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली.पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत.

पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप नेत्यांची देखील उमेदवारी देताना सर्कस होणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी १० डिसेंबर पासून अर्ज स्वीकृती