Nashik Tapovan जनआक्रोशापुढे गिरीश महाजनांची माघार

Pune नाशिक त्रंबकेश्वर येथील होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व अभिनेते अभिनेत्री एकत्र आल्या; तपोवन परिसरातील 1,825 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीने संतप्त लोकांच्या जनरेट्यापुढे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना माघार घ्यावी लागली. यामुळे जनशक्ती एकवटली तर सरकारला कशी धूळ चारू शकते, याचे हे उदाहरण!

साधुग्राम उभारणीच्या नावाखाली 33 एकर जागेत 220 कोटींचे पीपीपी तत्त्वावरील प्रदर्शन केंद्र हा निर्णय सुरुवातीपासूनच संशयास्पद होता. पर्यावरणवाद्यांचा प्रखर विरोध, शिवसेेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस या विरोधी पक्षांचा दबाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी महायुतीतीलच मित्रपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेनेने (शिंदे गट) आंदोलनाचे अस्त्र उगारत उचललेले भाजपविरोधी पाऊल या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला. यामुळे गिरीश महाजनांना अखेर प्रदर्शन केंद्राला स्थगितीची घोषणा करावी लागली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तपोवन परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यासाठी केवळ 10 वर्षांच्या आतील 1 हजार 700 वृक्षांचे पुन:रोपण शहरातील सिडको येथील पेलिकन पार्क, गंगापूर गाव येथील कानेटकर उद्यानासह उपलब्ध जागांच्या ठिकाणी केले जाणार आहे. यासह शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लागवड शासन व लोकसहभागातून  केली जाणार आहे. यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून 15 फूट वाढ झालेले हे वृक्ष  हैदराबाद येथून मागविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) खर्च करण्यात येणार आहे.

 तपोवनातील वृक्षांच्या पुन:रोपणासह नवीन लावण्यात येणाऱ्या वृक्षांची योग्य देखाभाल व निगा राखण्यात येईल. या वृक्षांमुळे हरित नाशिक- हरित कुंभमेळा संकल्पना साकार होवून आगामी काळात पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.