Municipal Election | महापालिका निवडणुकीचा धुराळा डिसेंबर अखेर!

Mumbai /Pune मतदार याद्यांचे घोळ निस्तरा, दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचा शोध घ्या, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक यंत्रणांना गुरुवारी दिले. या घोळ दुरुस्तीस लागणारा वेळ लक्षात घेता मुंबई, पुणे पिंपरी चिंचवड

नागपूर ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबरअखेर वाजण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी आयोगाने घेतलेल्या पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर हे संकेत मिळाले.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 अखेर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे नगर परिषद – नगर पंचायतींपाठोपाठ जिल्हा परिषदा आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा वाद लक्षात घेता त्याआधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.