CM Fadnavis राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
PUNE NEWS – राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जास्त आहे. जानेवारीत महापालिका आणि फेब्रुवारीत झेडपी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय पक्षांच्या नेत्यांना जोरदार धावपळ करावी लागणार आहे
त्यामुळे निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका प्राधान्याने पार पडू शकतात. त्यामुळे झेडपी निवडणुका फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. (Breaking News)PUNE NEWS – राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जास्त आहे. जानेवारीत महापालिका आणि फेब्रुवारीत झेडपी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय पक्षांच्या नेत्यांना जोरदार धावपळ करावी लागणार आहे.
आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची कल्पना नाही
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 – 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, असे ते म्हणाले.
