Pune निवडणुकीत महायुतीमधील वाद उफाळून आला आहे. शिवसेना-भाजपमधील हा वाद चव्हाट्यावर आला, याचा फटका मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत बसू नये यासाठी हा वाद सोडवण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-शिवसेनेमधला वाद उफाळून आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देण्यावरून वादंग झाला. त्यानंतर एकमेकांवर जोरदार टोलेबाजी आणि थेट पैसै वाटपावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. इतकंच नाही तर युती तोडण्यापर्यंत या चर्चा पोहोचल्या. अखेर आता भाजप-शिवसेनेमधला हा वाद सोडवण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
