मी बीड जिल्ह्याचा देव आपुनीच भगवान है धनंजय मुंडे नेमकं विधान काय?

Beed News – राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हेही पायाला भिंगरी लावून प्रचारसभा घेत आहेत.

एका प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी परळी पासून फाटक तुटू देत नसतो. रेल्वेसाठी पैसे मागितलेलं आहेत. रेल्वेची जागा हस्तांतरित होणार आहे. एका माहिन्याच्या आत घरकुल मंजूर करून देतो. म्हाडामधून सर्व्हे करून 1700 घरकुल आपण करणार आहोत. सिमेंट क्राँकीटचा रस्ता आपण पूर्ण केला. 65 कोटी रूपायाचं क्रिडा संकुल विद्यावर्धीनीची करणार आहोत.

लोकांना देवाच्या आधी मी आठवतो

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेत मला एवढी मत दिली की मशीनला मोजायला कंटाळा आला. तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम दिलेलं आहे ते विसरू शकतं नाही. एखाद्याला व्यक्तीला अडचण आली की देवांच्या आधी धनंजय मुंडेचा नंबर आठवतो. तो मला फोन करतो आणि त्याची अडचण सांगतो. मी नशीबवान आहे. माझं संबंध जीवन आपल्या सेवेत जाणार आहे.