आज पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 23 गावांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत व आस्थापने ( हुद्दा )बाबत मनपाच्या वेतन समितीने जो अन्यायकारक बदल केला आहे त्या संदर्भात या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली,
सन , 2021 साली 23 गावातील कर्मचाऱ्यांचाही समावेश पुणे मनपा मध्ये झाला, समावेश झाल्यानंतर पुणे मनपाच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेची चौकशी करण्यासाठी एक समितीची स्थापना करण्यात आली ,या समितीने चुकीच्या पद्धतीने व सूडबुद्धीने अहवाल तयार करून शेकडो कामगारांच्या वर अन्याय केला आहे ,यामध्ये अनेक कामगारांचे हुद्दे बदलले असून, पगारांच्या मध्ये खूप मोठी कपात करण्यात आली आहे ,यामुळे कर्मचारी वर्ग धास्तावला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे , अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी ,मुलांच्या शिक्षणासाठी , नवीन घर बांधण्यासाठी, हॉस्पिटल साठी लाखो रुपयाची कर्ज काढली आहेत, आता या कामगारांचे पगार कमी झाल्याने त्यांचे बँकेचे हप्ते सुद्धा वेळेवर जाणार नाहीत ,याबाबत अनेक गावातील कर्मचारी सातत्याने तक्रारी करत होते, यासाठी आज मी माननीय मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या कर्मचाऱ्यांच्या वर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे ,तसेच त्यांच्या पगारात कुठलीही कपात करू नये व त्यांच्या आस्थापनेत कुठलाही बदल करू नये अशी विनंती केली आहे, यावेळी माननीय आयुक्तांनी सदर समितीची पुन्हा चौकशी केली जाईल व कामगारांना योग्य न्याय दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले, या बैठकीसाठी मनपा उपायुक्त श्री प्रसाद काटकर, व अनेक गावचे कर्मचारी उपस्थित होते,
पुणे मनपा मधे समविष्ठ २३ गावच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत मनपा आयुक्तांची घेतली भेट
