Pune Update News UPI Cash Withdrawal Process:
आता जर तुम्ही चुकून डेबिट (एटीएम) कार्ड घरीच विसरलात तर काळजी करू नका, तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने कार्डशिवाय एटीएममधून सहज पैसे काढू शकता. देशात पहिले UPI एटीएम सुरू करण्यात आले असून आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा एटीएम कार्डची गरज भासणार नाही.
काळाबरोबर तंत्रज्ञानही आणखी प्रगत होत आहे आणि बँकिंग क्षेत्रात याचा सर्वाधिक मोठा प्रभाव पडताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच देशात पहिले UPI ATM सुरू करण्यात आले आहे. डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही कार्डशिवायही ATM मशीनमधून पैसे काढू शकता आणि यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाईल असला पाहिजे.
आता UPI च्या मदतीने ग्राहक डेबिट किंवा एटीएम कार्ड शिवायही ATM मधून पैसे काढण्यास सक्षम होती. यूपीआय एटीएम सुविधा सुरू झाल्यानंतर पैसे काढण्याची मर्यादाही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय UPI एटीएम कार्ड स्किमिंगसारख्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासही मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया UPI ATM मधून व्यवहार कसा होईल.
UPI वापरून ATM मधून पैसे कसे काढायचे
अनेक बँकांनी आधीच आपल्या ग्राहकांना ही सुविधा सुरू केली होती, पण आता रिझर्व्ह बँकेची व्याप्ती आणखी वाढली आहे. आता जवळपास सर्व बँका ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देतात. या सुविधेसाठी UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरला जाईल आणि असे व्यवहार फक्त एटीएम नेटवर्कद्वारेच केले जातील, त्यामुळे बँकांनाही दिलासा मिळणार आहे.
