पुण्यात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त खुर्च्या सतरंज्या उचलायचा का?; नगरसेवक होणार फक्त त्यांच्याच घरातले

Pune news मुंबईनंतर महत्त्वाची समजली जाणारी पुण्याची महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टीला तितकीच महत्त्वाची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत,

महापालिका निवडणुका जवळ येऊ लागताच अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे इच्छुक म्हणून चर्चेत येऊ लागताच निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अनेक निष्ठावंत हे पक्षांतराच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने सर्वपक्षीय आमदारांची ही घराणेशाही पक्षांच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ – कोथरुडमधील मयूर कॉलनी या प्रभागाचे नगरसेवक होते. त्यामुळे ही जागा कुटुंबाकडे कायम ठेवण्याकडे त्यांचा कल असणार आहे. त्यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचे नाव आता चर्चेत येऊ लागले आहे. दुष्यंत मोहोळ युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत.

नगरविकास, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ  – या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव करण मिसाळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी ते युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष होते

आमदार सुनील कांबळे यांनीही पुणे महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष या पदावर काम केले आहे होते.

त्यांच्या कन्या सुप्रिया कांबळे यांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रंजना टिळेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नगरसेविका टिळेकर यांनी यापूर्वी तीनवेळा पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे पूर्ण तयारीत आहेत

माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक हे माजी नगरसेवक आहेत. सलग दोनवेळा ते निवडून आले आहेत. यावेळी ते ‘हॅटट्रीक’ साधण्याची शक्यता आहे.

अजित दादांची राष्ट्रवादी देखील घराणेशाहीत पुढेच

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे हे देखील आपले चिरंजीव ईशांत तुपे यांना उमेदवारी देऊन राजकीय वारसा पुढे नेऊ शकतात मात्र कार्यकर्त्यांचे काय असा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना उपस्थित झाला आहे.

माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार पक्षाचे तुतारीचे आमदार पठारे यांचादेखील मुलगा वाघोली चंदननगर या भागातून तयारी करताना दिसून येत आहे त्यांचा दुसरा पुतण्या महेंद्र पठारे सध्या नगरसेवक आहे.

सत्ताधारी पक्षांमध्ये नेतेमंडळींच्याच मुलांनी घरच्यांनी जर उमेदवारी घेऊन बसले व घरातच पक्ष ठेवले तर कार्यकर्त्यांचे काय होणार कार्यकर्ते फक्त गुन्हे दाखल करायला मोर्चे काढायला आठवतात का असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे?