पुरंदर तालुक्यात वाढत्या अनधिकृत प्लॉटिंग आणि नागरिकांची होणारी फसवणूक यावर प्राधिकरणाने मोठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत देवडी, आंबोडी आणि काळेवाडी येथे कारवाई करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत पुरंदर तालुक्यातील एकूण १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी अनधिकृत प्लॉटिंग आढळलेल्या ठिकाणी तात्काळ कारवाई सुरू आहे.
या कारवाईत काय करण्यात आले?
बेकायदेशीर प्लॉटिंगवर निष्कासन
बेकायदेशीर अंतर्गत रस्ते हटवणे
अवैध डिमार्केशन पोल हटवणे
ही संपूर्ण मोहीम महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून या
कारवाईत अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त किरणकुमार काकडे आणि पीएमआरडीएची टीम सहभागी होती.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सर्वांना सूचना आहे की नागरिकांनी कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी तिची कायदेशीर स्थिती तपासूनच निर्णय घ्यावा. अनधिकृत प्लॉटिंगविरोधात पीएमआरडीएची मोहीम पुढेही सुरूच राहणार आहे.
