उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, भाजपला मोठा धक्का

pune स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बरेच नेते पक्षांतर करत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला असून कल्याण डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

भाजपचे नाराज माजी नगरसेवक सुरेश भोईर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुरेश भोईर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

कल्याण टिटवाळा परिसरातील भाजपचे निष्ठावंत माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुरेश भोईर यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर ठाकरे गटाची ताकद वाढला आहे.