pune भोर नगरपरिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.सोमवारी (दि.१७) नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी नितीन बबन सोनवले, नूतन संजय जगताप, कविता अरुण खोपडे, रामचंद्र श्रीपती आवारे, ऋषभ रामचंद्र आवारे, संजय दत्तात्रय जगताप,
गणेश ज्ञानोबा पवार, कविता अरुण खोपडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये कविता खोपडे यांनी नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज भरले आहेत. भाजपाकडून संजय जगताप यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून रामचंद्र आवारे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे.
उमेदवारी डावल्याबद्दल नाराज असलेल्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करू नये तसेच इतर पक्षात प्रवेश करण्यात वाव मिळू नये यासाठी उमेदवारी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली असून उमेदवारांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
