Rishabh Pant : ऋषभ पंत भारताचा ‘सिक्सर किंग’; सेहवाग आणि रोहितसारख्या दिग्गजांना टाकले मागे

PUNE भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंत आता कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

भारताच्या पहिल्या डावात पंतने दोन षटकार आणि तितकेच चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिल फक्त तीन चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऋषभ पंतने 24 चेंडूत 27 धावा केल्या. या दरम्यान, त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. यासह, तो कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. ऋषभ पंतने आतापर्यंत खेळलेल्या 83 कसोटी डावात 92 षटकार मारले आहेत, तर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने 180 डावात 91 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे पंत आणि सेहवागनंतर रोहित शर्मा (88), रवींद्र जडेजा (80) आणि एमएस धोनी (78) यांचा क्रमांक लागतो.