राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष पैसे घेऊन उमेदवारी देतो मोठ्या नेत्याचा आरोप

इंदापूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे.