Pune Bihar Election Results : दहा हजार रूपयांच्या योजनेमुळे बिहारमध्ये एनडीए सत्तेत, निवडणूक आयोगाने विचार करावा; शरद पवार यांची प्रतिक्रिया
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या दहा हजार रुपयांच्या योजनेचा परिणाम झाला असावा. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक महिलेला दहा हजार देणे ही लहान गोष्ट नाही. पैसे देऊन निवडणुका लढवणे हे पारदर्शकपणाचे लक्षण आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, बिहारमधील मतदानांनंतर मी काही लोकांशी बोललो त्यांनी सांगितले की, बिहारमध्ये महिलांचे मतदान ५० टक्के होते ही निवडणूक महिलांनी हाती घेतली. कोणत्याही निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत.यावर निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. निवडणुकाआधी पैसे वाटण्याची घोषणा केली गेली पण हा पैसा कुठला आहे याचा विचार करावा. जर सामान्य लोकांचा पैसा असेल तर याचा अर्थ या निवडणुका गैरमार्गाने लढवल्या आहेत असा अर्थ होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या युतीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेबाबत ते म्हणाले की, त्यांनी तसा निर्णय घेतला तर यात काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही
