सुप्रियाताई मुळूक यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

सुप्रियाताई मुळूक यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

पुणे Pune News :: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक निवडी करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या छावा संघटनेच्या उपाध्यक्ष सुप्रियाताई हनुमंत मुळूक यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी वर्णी लागली आहे.

यावेळी त्यांना निवडीचे पत्र शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते देण्यात आले,

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. गण, गट, प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यादृष्टीने संघटना बांधणी, नियोजन सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेतही बदल करण्यात आले आहेत.