MBBS admission 2025 : एमबीबीएसच्या तिसऱ्या यादीचा कटऑफ 600 पार

दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीतील 1 हजार 764 रिक्त जागांसाठी यादी जाहीर झाली असून तिसऱ्या यादीतही एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठीचा कटऑफ 600 गुणावर पोहचला.

खुल्या प्रवर्गात एमबीबीएसला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 615 गुणांचा कटऑफ राहिला. तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातून शासकीय महाविद्यालयात 502 एवढा कटऑफ राहिला. यामुळे तिसऱ्या फेरीतही वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी कटऑफ चढाच राहिल्याने प्रवेशासाठी चुरस कायम होती.

एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयांतील जागांसाठी खुल्या प्रवर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने नीट परीक्षेत किमान 615 गुण मिळवले असणे अपेक्षित आहे. खासगी महाविद्यालयांसाठी ही पात्रता 545 गुणांची आहे. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाविद्यालयांत हा कटऑफ 600 एवढा असून खासगी महाविद्यालयांसाठी 460 एवढा खाली आहे.