जमीन चोर निघाला मुरलीधर..; रवींद्र धंगेकरांची मोहोळांवर खोचक टीका !

Pune news पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीप्रकरणावरून राजकीय वादंग चांगलाच पेटला आहे. या प्रकरणावरून माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

धंगेकर यांनी एक्स (माजी ट्विटर) वर एक पोस्ट करत लिहिलं ‘काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..! Stay tuned!’या एका वाक्याने पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. धंगेकरांच्या या पोस्टमुळे शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजपा असा वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्याचा आरोप काही दिवसांपासून होत आहे. ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्या कंपनीत खासदार मुरलीधर मोहोळ यांचा कुठलाही संबंध नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात काही कथित कागदपत्रे सुद्धा सादर करण्यात आली आहेत.