मराठवाड्यातील पूरग्रस्तांची दिवाळी गोड; बाबुराव चांदेरे फाउंडेशनच्या वतीने 15000 लोकांना किट वाटप

पुणे प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी सरंजाम वाटप सोहळा आयोजित करण्यात येतो; मात्र यावर्षी सरंजाम वाटप सोहळा वेगळा पहिला मिळाला.

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लोकांना प्राधान्य देत बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन च्या वतीने जवळपास 15 ते 20 हजार लोकांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आला,

यावेळी आमदार राहुल भैय्या मोटे, मा.आमदार विजयराव भांबळे, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सुर्यकांत पाठक साहेब, मा.नगरसेवक प्रमोद निम्हण, मा. नगरसेविका रोहिणीताई चिमटे यांच्यासह बाणेर,बालेवाडी,पाषाण,सुतारवाडी,सुस व म्हाळुंगे मधील मान्यवर, नागरिक कार्यकर्ते व महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी सरंजाम हा उपक्रम म्हणजे केवळ वस्तूंचं वाटप नव्हे, तर मनांचा उत्सव, नात्यांचा जप आणि समाजाशी असलेली आपुलकी दृढ करण्याचं एक माध्यम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. 2006 पासून सुरू झालेल्या या परंपरेला आज 2025 मध्ये भावनिक सातत्य आणि जनतेच्या विश्वासाचं बळ लाभलेलं आहे असे मत माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.