अनिल परबांनी केबलमध्‍ये किती बोगस कंपन्‍या काढल्‍या?

Pune योगेश कदम हे गेली तीन वर्ष टार्गेटवर आहेत. अनिल परब यांना योगेश कदम यांचा केवळ राजीनामा हवा आहे. ते धादांत खोटं बोलत आहेत, प्रेम नगरमधील मराठी माणसाला देशाधडीला लावणारे परब हे महाराष्‍ट्रात कदम कुटुंबीयांची बदनामी हा एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत.

माझा केबल व्‍यवसाय असल्‍याचे परब सांगतात;मग त्‍यांनी किती बोगस कंपन्‍या काढल्‍या, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज (दि.९) केला.

कदमांना बदनाम करण्‍याचा एक कलमी कार्यक्रम

पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम म्‍हणाले की, “आम्‍हाला बदनाम करण्‍यासाठी अनिल परब हे ठाकरेंच्‍या सांगण्‍यावरुन बोलत आहेत. त्‍यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मागील काही वर्ष माझे पुत्र योगेश कदम यांना टार्गेट केले जात आहे. केवळ बदनामी करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.”

माझ्‍या पत्‍नीला खोटे ठरवत आहेत

माझ्‍या पत्‍नीला जाळण्‍याचा प्रयत्‍न केला, असा खोटा आरोप अनिल परब करत आहेत. या प्रकरणी माझ्‍या पत्‍नीने स्‍वत: माध्‍यमासमोर येवून खुलासा केला आहे. तिने माध्‍यमांसमोर वस्‍तुस्‍थिती सांगितले आहे. तरीही परब वारंवार तोच आरोप करत आमची बदनामी करत आहेत, असेही रामदास कदम म्‍हणाले.