मुळशीतील होम मिनिस्टर कार्यक्रम ठरतोय महिला भगिनींच्या कलागुणांना वाव देणारा

मुळशी प्रतिनिधी (Mulashi News) मुळशी तालुक्यातील पौड येथील भारतीय जनता पार्टीचे तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांच्या सुविद्य पत्नी कोंडावळे – कळमशेत लोकनियुक्त सरपंच कंधारे यांच्या माध्यमातून पौड जिल्हा परिषद सर्कल मध्ये खास महिलांसाठी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक गावात केले आहे.

विठ्ठलवाडी, दिगंबरनाथ मंदीर पौड, जय हनुमान मंडळ पौड, बाजार पेठ पौड, कळमशेत, खेचरे, बेलावडे, चिंचवड, मांदेडे, आंदिशे, शेरे, जामगाव, वळणे, मुळशी खुर्द, कुळे
कोळवण, या गावात मोठ्या उत्साहात होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला,

यामुळे महिला भगिनींच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान पाहायला मिळाले यामध्ये अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती, प्रोत्साहन पर बक्षीस देखील वितरण करण्यात आली,

गाव खेड्यातील महिला भगिनींच्या कलागुणांना या यामुळे निश्चितच वाव मिळाला यामुळे या उपक्रमाचे सर्वच गावकऱ्यांनी कौतुक केले,

18 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे असे देखील आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.