निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं, मुलागाही हायफाय शाळेत!

pune news पुण्यात एकीकडे पोलिसांकडून (Police)सटर-फटर गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची वरात काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेशघायवळ हा लंडना पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातूनच समोर आली आहे.

पुण्यातील कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेशघायवळवरमकोकाकायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, निलेशघायवळ पुण्यातून (Pune) लंडनला पळून गेल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळलापासपोर्ट (Passport) मिळाला कसा? हा खरा प्रश्नयानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, घायवळनेपासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असे याबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले.

कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. निलेश घायवळनेपासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असं पोलिसांनीम्हटलं. तसेच, त्याच्याबाबत लूकआऊटनोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं. निलेशघायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतलं आहे. निलेशचा मुलगाही लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनीसांगितलं.