राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येणाऱ्या ९ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
कसा मिळणार या योजनेचा लाभ?
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, या योजनांच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीपैकी २०% रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी वापरली जाईल. याच राखीव निधीतून ५ लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या उपचारांसाठी मदत केली जाईल. यामुळे, गरजू रुग्णांना आर्थिक मदतीअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही.
- हृदय प्रत्यारोपण: ₹१५ लाख
- फुफ्फुस प्रत्यारोपण: ₹२० लाख
- हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण: ₹२० लाख
- यकृत प्रत्यारोपण: ₹२२ लाख
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण: ₹९.५ लाख ते ₹१७ लाख
- ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI) आणि रिप्लेसमेंट (TMVR): ₹१० लाख
