बाणेर प्रतिनिधी :: बाणेर परिसरातील व हायवे लगतच्या परिसरातील नागरिकांना या ट्राफिकच्या समस्येमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले होते, रहिवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती बाबुराव चांदेरे यांनी या कामात लक्ष घालत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करत या समस्येवर तोडगा काढावा अशी विनंती केली होती त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर पुणे महापालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठपुरवठा करत
आज प्रत्यक्ष ननावरे चौकातील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली या कामाची पाहणी आज पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी केली.
प्रत्यक्षदर्शी या कामाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
