पुणे प्रतिनिधी – (Pune News) Sanjay Raut Vs Ajit Pawar : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून सुरू झालेला वाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच पेटला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘अर्धे पाकिस्तानी’ संबोधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पुणे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना वाचाळवीर पद बहाल करावे
खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे वाचाळ वीर नेते आहेत त्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी वाचाळवीर पद निर्माण करून बहाल करावे अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
संजय राऊतांचीच डीएनए चाचणी करा; वैयक्तिक पातळीवर टीका करणे हे आपले धोरण नसल्याचेही चांदेरे यांनी स्पष्ट केले. तसेच, ते म्हणाले की अजितदादा पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे,
मात्र संजय राऊत नेहमीच सकाळी नऊ वाजले की भोंगा चालू करतात व महायुती सरकारवर टीका करत असतात अशा टिकाकारांकडे आम्ही लक्ष देत नाही मात्र वैयक्तिक पातळीवर टीका सहन देखील करणार नाही इथून पुढे आमच्या नेत्यावर टीका केली तर पुणे शहरात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही असा सजड इशाराही यावेळी पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला
संजय राऊत यांच्या याच टीकेमुळे Pune युवक राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आता वैयक्तिक हल्ल्यांच्या पातळीवर पोहोचले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
