बाणेर प्रतिनिधी :: मुंबई, पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील, असे सांगण्यात येत आहे.
आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार आहेत. असे असले तरी स्वबळावर की युती म्हणून याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनेही जोरदार तयारीला सुरुवात केली आहे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दुष्यंत मोहोळ यांची नियुक्ती केली आहे
दुष्यंत मोहोळ युवा मोर्चाचे अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर यांनी पुणे शहरातील सर्वच अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
आज त्यांनी बाणेर येथील भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश कळमकर यांची भेट घेतली याप्रसंगी शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
