बाणेर प्रतिनिधी Pune update news पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मोठा हातभार लावण्याचे बाणेर भागात दिसून आले,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा बालवडकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालेवाडी येथील दसरा चौकातील जनसंपर्क कार्यालयाजवळ गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती.
या तलावात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ६ ते ७ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. तसेच पुणेकरांनीनदी किंवा जलस्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते.
गणेश भक्ताची विसर्जन करताना हरवली लाखोंची सोन्याची चैन
गणेश विसर्जनासाठी दसरा चौकात मोठी गर्दी पाहायला मिळेल सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा बालवडकर यांचे कार्यकर्ते देखील मदतीस उपस्थित होते त्यावेळी एका गणेश भक्ताची गळ्यातील चैन हरवली.
बालवडकर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी सुषांत पॉल यांना ती चैन सापडताच त्यांनी ती प्रामाणिकपणे परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला त्यामुळे त्यांचे सर्वच गणेश भक्तांनी कौतुक केले.
