पुणे : MPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीचा वेदनादायक मृत्यू

Pune News पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पालू गावची मुलगी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ च्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी अश्विनी केदारी हिचे अचानक निधन झाले आहे.

वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अश्विनीने जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. अश्विनी अभ्यासासाठी लवकर उठली. तिने आंघोळीसाठी हीटर लावून बादलीत पाणी गरम केले होते. या दरम्यान तिला थोडा वेळ झोप लागली. ती उठली तेव्हा पाणी पूर्णपणे उकळले होते. हीटर बंद करून बादली उचलत असताना अचानक तिच्या अंगावर उकळते पाणी पडले आणि पाय घसरल्याने ती खाली पडली. या अपघातात तिच्या शरीराचा सुमारे ८० टक्के भाग भाजला. तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर अश्विनीचा मृत्यू झाला.

कुटुंबातील होती. कठोर परिश्रम आणि समर्पणाने तिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला. भविष्यात जिल्हा दंडाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती त्या दिशेने तयारी करत होती.