बालेवाडीतील मुक्ताईनगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

बाणेर प्रतिनिधी -: बालेवाडी येथील मुक्ताईनगर गावठाण परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरणारा रस्ता म्हणजे मुक्ताईनगर गावठाण येथील रस्ता ठरला होता खड्डे, चिखल व धुळीमुळे या रस्त्यावरून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक तथा पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन पालिका अधिकाऱ्यांची चर्चा करत यावर तोडगा काढत अखेर रस्त्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली,

या रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते अखेर आज रस्त्याचे काम पूर्णत्वास आले याबद्दल परिसरातील नागरिकांनी बाबुराव चांदेरे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी बाबुराव चांदेरे म्हणाले की माजी सरपंच श्री गणपतआप्पा बालवडकर, श्री किसन बाप्पू बालवडकर, श्री दिलीप बालवडकर, श्री निलेश बालवडकर, श्री चंद्रकांत कांबळे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

तसेच मुक्ताईनगरच्या सर्व नागरिकांनी दिलेला विश्वास आणि श्री राहुल बालवडकर यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हे काम वेगाने पूर्ण होऊ शकले, व नागरिक देखील या समस्येतून सुटलेले आहेत त्याबद्दल चांदेरे यांनी सर्वांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.