पुणे- ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीने पेटून उठलेल्या मराठ्यांनी मुंबईत येऊन तीव्र आंदोलन छेडलं आहे. मुंबई आणि नवी मुंबई येथे या आंदोलकांनी ठिकठकाणी रास्ता रोको देखील केला होता. अशातच आता नवी माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी आता अर्थव्यवस्थेची इमारत म्हणजे शेअर मार्केटच्या इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. गेले काही दिवस आक्रमक झालेल्या मराठा समाजाने तीव्रपणे आंदोलन छेडलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत काही आंदोलकांची घुसण्याचा प्रयत्न केल्याचं देखील समोर आलं आहे. याबाबतचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंदोलक जेव्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी सुरु केली. सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठी अशी घोषणाबाजी करण्यास देखीस सुरुवात केली.
