मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. २७ ऑगस्टला ते अंतरवाली सराटीतून निघाले. आज २८ ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की मुंबईतील आंदोलनाला एक दिवसाची परवानी देणे म्हणजे गोरगरीब मराठ्यांची चेष्टा करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी समाजाच्या भावना समजून घ्याव्यात.
मराठे तुम्हाला कधीच विसरणार नाही
तुम्ही आमचे शत्रू नाहीत मोठ्या मनाने वागा. आडमुठी भूमिका घेऊ नका, मी शिवनेरीवरुन सांगतो की तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, मराठ्यांची मने जिंकण्याची हीच संधी आहे. मला वाटतं की ते आंदोलकांना थांबवणार नाहीत असं विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
