पुणे- मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, अंतरवाली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघाले. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास नगरजवळ पोहचला आहे. एकंदर पाहता त्यामुळे नियोजित जुन्नर येथे मुक्कामी पोहचण्यास मोर्चाला विलंब होणार आहे. शेवगाव येथे बोलताना जरांगे यांनी निर्णायक लढाई असून, समाजाने मोर्चात बहु संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोर्चाचा ताफा वडीगोद्री फाटा येथे पोहोचला असता, गाड्यांचा आणि पायी चालणाऱ्या समाजबांधवांचा प्रचंड लोंढा पहायला सोलापूर-धुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन ते तीन किलोमीटरवर गाड्यांची अखंड रांग होती. अवघे दहा किलोमीटर अंतर पार करायला तब्बल तीन तास लागले. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा अंकुशनगर-कारखाना, शहागड येथे पोहोचला.
सर्वसमावेशक मोर्चा
हजारोंचा मोर्चात हजारोंचा जनसमुदाय एकच नारा देत होता, तो म्हणजे पाटील-पाटील. तसेच तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ हैं, आरक्षण देत कस नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण घेऊनच मुंबईतून पर-तणार या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मोर्चामध्ये डॉक्टर, वकील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असे गरीब श्रीमंत समाजबांधव सर्व समावेशक सहभाग दिसून आला
