गल्ली ते दिल्ली सत्ता असताना भाजपने काय केले मतदारांपुढे घेऊन जाणार महाविकास आघाडीची बैठक संपन्न

पुणे प्रतिनिधी- अनेक वर्षे पासून रखडलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, त्याचाच भाग म्हणून प्रभाग रचनेचा मसुदा संबंधित महानगरपालिकांनी जाहीर केला आहे. सत्ताधारी पक्षाला अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

त्याच वेळी सत्ताधारी महायुतीतही प्रभागांच्या रचनेवरून धुसफूस सुरू झाली आहे.

सुस बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची एक गोपनीय बैठक बाणेर येथील हॉटेलमध्ये पार पडली.‌

या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी सर्व गावांमध्ये मुद्द्यांच्या आधारावर प्रचार करतील अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

बाणेर मधील भाजपाचा नगरसेवकांनी पाच वर्षात फक्त आधार कार्ड अपडेट कॅम्पस घेतले

गल्ली ते दिल्ली सत्ता असताना महापालिकेत देखील बहुमत असताना भाजपच्या नगरसेवकांनी काय केले हे आता जनतेपर्यंत घेऊन जाऊ केवळ आधार कार्ड कॅम्प अपडेट याच्याशिवाय यांनी काहीच केले नाही असा आरोपही यावेळी बैठकीत करण्यात आला.

पाषाण, सुतारवाडी, उत्तर बाणेर, दक्षिण बाणेर, बालेवाडी, सुस महाळुंगे, सोमेश्वरवाडी, विधातेवस्ती परिसरातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते.

भाजपा रडीचा डाव करत असून सुमारे एक लाख तीस हजारापेक्षा अधिक मतदार संख्या असलेला प्रभाग तयार केला आहे. सात गावांचा परिसर असलेला हा प्रभाग जिंकण्यासाठी तसेच मतदारांपर्यंत महाविकास आघाडीच्या भूमिका पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार करावी लागणार असून याबाबत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

परिसराचा विकास करण्यास भारतीय जनता पार्टीचे गल्ली ते दिल्ली सत्ता असताना महापालिका सत्ता अपयशी ठरले आहेत.

नागरिक त्रस्त असून याकडे सत्ताधारी व प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित शक्ती नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.