Pune पुणे शहरातील मेट्रोचं जाळं विस्तारताना दिसत आहे. शहरात विविध ठिकाणी नवे मेट्रो स्थानके उभारण्याची काम जलद गतीने सुरू आहे. तर काही नव्या मेट्रो मार्गिकांना हिरवा कंदील मिळाल्याने तेही कामं सुरू आहे.
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैरान झाले आहेत. यावर पर्याय म्हणून पुणे मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे. पण अजूनही काही ठिकाणी मेट्रोची सेवाची पोहचलेली नाही.
आता नुकत्याच एका कार्यक्रमात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माऊली भक्तांसाठी मोठं आवाश्वन दिलं आहे.शहरातील वाहतुकीची वाढती कोंडी लक्षात घेता पुणे-आळंदी मेट्रोची गरज जाणवत आहे. तर पुण्यात मेट्रोचे काम गतीने सुरू आहेत. पुण्यात चालू असून कळस-धानोरी मेट्रो डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये आळंदीचा समावेश केला जाईल आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने हा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे 22 किलो वजनाचा सुवर्ण कलशारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी वरील विधान केलं आहे. सुवर्ण कलशासमवेत उभारलेल्या ध्वजाचे पूजन मोहोळ यांच्या हस्ते रविवारी दि. २४ अॉगस्ट या दिवशी करण्यात आले. यावेळी त्यांनी आळंदीपर्यंत मेट्रो आणण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या या विधानामुळे आता माऊली भक्तांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
