बाणेर प्रतिनिधी – (Baner – Sus – Pashan ) पुणे महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या प्रभाग रचना जाहीर झाल्या या प्रभाग रचनेमुळे सर्वच पक्षात नाराजी देखील पाहायला मिळाली मात्र सुस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीत सब कुछ सही है असे वातावरण पाहायला मिळाले, शहरातील काही भागात शिंदे शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कभी खुशी कभी गम पाहायला मिळाले.
पुणे शहरातील प्रारुप प्रभाग रचनेत मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेते मोठे बदल करण्यात आले आहे.
प्रभाग क्र. 9 सुस बाणेर पाषाण – बालेवाडी गावठाण,बाणेर गांवठाण,पाषाण गावठाण,सुतारवाडी,सूस,हाळुंगे, एलिट एम्पायर सोसायटी, नंदन प्रास्पेरा सोसायटी, ए.आर.डी.ई. भारत इलेक्ट्रॉनिक्स, पाषाण सोमेश्वरवाडी, संजय गांधी नगर, विधाते मुरकुटे वस्ती (भाग), समर्थ कॉलनी ,वीरभद्र नगर, वसंत विहार, लक्ष्मण नगर, रामनगर, पारखे वस्ती, विद्या व्हॅली स्कूल, विंडोज सोसायटी, सुखवणी ग्रेसीया, शितलादेवी नगर, बेलाकासा सोसायटी, विस्परिंग विंडो सोसायटी, लमाणवस्ती व इत्यादी सुस माळुंगे हे गावे नव्याने जोडली गेली आहेत.
या गावांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेनेचे देखील ताकत असल्यामुळे जोरदार लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे महानगरपालिकेत महायुती जर झाली तर सर्वच इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गोची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे, सर्वच पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणाचा पत्ता होणार कट याकडे सर्वांचेच लक्ष
2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतून अमोल बालवडकर, ज्योती गणेश कळमकर, स्वप्नाली प्रल्हाद सायकर हे भारतीय जनता पार्टीतून निवडून गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे हे एकमेव निवडून आले.
प्रभागाची एकूण लोकसंख्या -९०९०३ अ.जा.-१०३६७ अ.ज.-२१५४
मात्र यावेळी निश्चितपणे इतर मागासवर्गीयांना जागा सुटण्याची दाट शक्यता असल्यामुळे नेमका कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे तीन नगरसेवक भाजपाचे असल्यामुळे त्यांच्यातच मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपा सर्वाधिक इच्छुक
माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक ज्योती कळमकर, माजी नगरसेवक स्वप्नाली प्रल्हाद सायकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, बाणेर मंडलचे भाजपाचे अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रवीण शिंदे,विशाल गांधीले, प्रकाश तापकीर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, शिवम बालवडकर, शिवम सुतार, सुहास भोते, सचिन पाषाणकर, उमा गाडगीळ, कल्याणी कोटेकर,सचिन दळवी, स्नेहल सचिन सुतार, स्वरूपा शिर्के, प्रियंका बालवडकर,स्वरूपा शिर्के,अस्मिता करंदीकर,आदी इच्छुक पाहायला मिळतात इच्छुकांची मोठी संख्या असल्यामुळे बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.
तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून
माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण,
राहुल बालवडकर, सागर बालवडकर, मनोज बालवडकर,विशाल विधाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूनम विधाते,रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, संग्राम मुरकुटे, बालम सुतार, आदी इच्छुक आहेत.
तर शिंदे शिवसेनेकडून
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदरे, नारायण चांदेरे आदी इच्छुक पाहायला मिळतात.
तर महाविकास आघाडीकडून
दिलीप मुरकुटे, स्वाती चांदेरे,मयूर भांडे, अशोक दळवी, नानासाहेब वाळके, राजेंद्र धनकवडे, जीवन चाकणकर, केशव बालवडकर, रोहित धेंडे, संदीप बालवडकर,जयेश मुरकुटे, योगेश सुतार,योगेश विधाते महाविकास आघाडी कडून देखील तगड्या आव्हान निर्माण होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आम आदमी पार्टी कडून सुदर्शन जगदाळे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनिकेत मुरकुटे देखील इच्छुक आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टीतून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी आपल्या पदरात पाडू शकतात अशी देखील चर्चा रंगताना व छुप्या गाठीभेटी होताना दिसून येत आहेत.
मात्र यावेळी निवडून येण्यासाठी प्रत्येकाचीच कसोटी लागणार आहे हे मात्र नाकारता येणार नाही.
