Pune News पुणे महापालिकेचे कामकाज सकाळी पावणेदहा वाजता सुरू होते, पण अनेक अधिकारी-कर्मचारी हे उशिरा येतात त्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. अशा अधिकाऱ्यांबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कडक भूमिका घेतली.
नवल किशोर राम यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर झाले नाहीत, तर थेट कारवाई होईल. दोन आठवड्यांपूर्वीही उशिरा येणाऱ्यांना ताकीद देण्यात आली होती; मात्र त्यातूनही काही धडा घेतला गेला नाही. त्यामुळे मोहिम राबवून उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांना थेट प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. उशिरा आलेल्या सुमारे ७५० कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेतली आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आलेली आहे. यामध्ये सहा विभाग प्रमुखांचा समावेश आहे. या प्रकारामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.मुख्य महापालिका भावना सह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचारी अधिकारी सकाळी उशिरा येतात आणि संध्याकाळी लवकर निघून जातात.
