पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच; भाजपात कुरघोड्या;

Pune News – पुणे प्रतिनिधी -: आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महानगर पालिकेकडून प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ चे जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यायच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत.

प्रभाग रचना जाहीर होताच प्रभाग क्र 9 मध्ये माजी नगरसेवकात कुरघोड्या

बाणेर भागातील प्रभाग क्रमांक 9 या प्रभागात 2021 मध्ये बिटवाईज चौकात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, यांच्या संकल्पनेतून या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले, यावेळी परिसरातील अनेक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते,

त्यात बिटवाईज चौकात अचानकपणे संकल्पना बदलली गेली

पुणे महापालिकेच्या पैशातून केलेले शुशोभीकरणाचे पेंटिंग पुसण्याचे काम केले गेले आहे. यामध्ये महापालिकेने केलेल्या खर्चाची रक्कम ही पुणे शहरांमधील व बाणेर भागातील टेक्सपियर लोकांकडून वसूल केली जाते हे मात्र माजी नगरसेवक कदाचित विसरले असतील.

नगरसेवक स्वप्नालीताई सायकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या चौकात अचानकपणे माजी नगरसेवक अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ट्राफिक वॉर्डनचे संकल्पना अचानक दिसू लागले, हे ट्राफिक वॉर्डन निवडणुका होईपर्यंत दोन-तीन महिने असणार का कायमस्वरूपी असणार अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये होऊ लागल्या आहेत.

यावरून अलबेल नाही हे देखील दिसून येत आहे यामुळे पुढील काळातच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एकत्रित लढतात का वेगवेगळे लढतात हे पहावे लागेल

यावेळी महापालिकेतून कोणाचा पत्ता होणार याकडे सर्वांचेच लक्ष

बाणेर भागाची वॉर्ड रचना आज जाहीर झाली; येत्या काही दिवसातच आरक्षण पडले जाण्याची शक्यता आहे, यावेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये इतर मागासवर्गीय एक जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अंतर्गत कुरघोड्या मोठे बळ मिळणार आहे.

बाणेर भागात जनहिताचे कोणतेच कामे होताना दिसत नाहीत, कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे, त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत.