रोहित पवारांनी कर्जत जामखेड कडे लक्ष द्यावे; ट्वीट करण्याच्या नादात पार्टी रिकामी होईल – समीर चांदेरेंचा टोला

पुणे प्रतिनिधी (Samir Chadhore on Rohit Pawar ) राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar) यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सुनेत्रा वहिनींच्या उपस्थितीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार रोहित पवारांना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी चांगले सुचवले आहे,

रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात काय परिस्थिती आहे ते पहा स्वतःच्या मतदारसंघात संपूर्ण दिग्गज पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेले तरी रोहित पवारांना ट्विट करण्याच्या नादात समजलेच नाही असा सणसणी टोलाही समीर चांदेरे यांनी लगावला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले की रोहित पवारांना नेहमी चर्चेत राहायची सवय लागली आहे त्यामुळे ते मतदारसंघाला दुर्लक्ष करीत केवळ कोण काय करताय, कोण कोणाची भेट घेते याकडेच जास्त वेळ लक्ष देतात, त्यामुळे त्यांचा कर्जत जामखेड मतदारसंघातील पक्ष देखील रिकामा होत चालला आहे, आमचे देखील जुने सहकारी मित्र तुमच्या पक्षात मतदारसंघात आहेत ते आम्हाला सर्व काही गोष्टी सांगतात मात्र दुसऱ्याच्या गोष्टीत आम्ही नाक खुपसत नाही रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यावे अन्यथा सभापती राम शिंदे तुम्हाला सपाट करतील असा टोलाही त्यांनी लगावला.

खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी

खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. महायुतीमध्ये असूनही अजित दादा पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी महायुतीच्या सर्व सांसदांना हेडगेवार स्मारक येथे बौद्धिकाचे आमंत्रण असते. परंतु, अजित दादा पवार आणि त्यांचे आमदार तिथे जात नाहीत. त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनाच्या वेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी उपस्थित राहिल्या. भाजप खासदार कंगना राणौत यांनी या बैठकीचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार यांच्या मागे भारतमातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसत आहे. ही उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.