Wagholi News : वाघोलीत पत्र्याचा मंडप कोसळला

wagholi news एका शैक्षणिक संस्थेच्या मैदानातील पत्र्याचा मंडप दुपारी अचानक कोसळला. त्यावेळी मंडपात कार्यक्रम नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एका कार्यक्रमासाठी ३० हजार चौरस फुटांचा पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी एकपर्यंत याठिकाणी कार्यक्रम झाले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास मंडप अचानक कोसळला. घटनेनंतर संस्थेचे आणि पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

या मंडपाखाली कोणी अडकले नसल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ‘मंडप कोसळल्याचे कळताच सर्व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचलो. मंडपात कोणीही नसल्याने दुर्घटना टळली,’ असे वाघोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितले.