पुणे (Pune Smart Meter Protest) महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने पुणे महानगरसह बाणेर सुस माळुंगे पाषाण रोड परिसरातील परिसरात वीज ग्राहकांना कुठलीही सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.
नागरिकांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी देखील विरोध दर्शवला आहे,
ते म्हणाले की;’ आधी समस्या सोडवा, मग स्मार्ट मीटर बसवा अशी मागणी केली आहे, परिसरातील नागरिकांना विजेच्या संदर्भात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वाढीव वीजबिले, सततचा विजेचा लपंडाव इत्यादी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
स्मार्ट मीटर बसवण्या अगोदर परिसरातील सर्व विजेच्या समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या यावेळी त्यांनी दिला आहे.
वाढीव बिलाबाबत देखील अनेक तक्रारी
अनेक सोसायटीतील नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केले आहेत पूर्वी दोन हजार रुपये बिल येत होते, तिथे आता पाच आणि सहा हजार रुपये बिल येते याच्यावर देखील लवकर तोडगा काढावा असा देखील इशारा त्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे
