पुणे प्रतिनिधी (Radhakrishna vikhe News Lokmat) लोकमत समूहाच्या वतीने ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चे दुसरे पर्व लंडनमध्ये १८ ऑगस्ट रोजी पार पडले आहे,
या परिषदेमध्ये जगभरातील अर्थतज्ज्ञ, उद्योगपती, धोरणकर्ते आणि नवउद्योजक सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यंदाचा कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रधान करण्यात आला आहे, यावेळी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, लोकमत समूहाचे विजय दर्डा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सिने अभिनेते सुनील शेट्टी, अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकमत हा पहिला माध्यम-समूह आहे ज्याने लंडनमध्ये जागतिक परिषद आयोजित केली. यामुळे भारतीय पत्रकारितेचा दर्जा आणि विश्वासार्हता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. लोकमतने नव्या दृष्टिकोनातून जागतिक विचारमंथनचे व्यासपीठ उभे केले आहे. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते अनेक मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
कन्व्हेन्शन’चे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या पहिल्या परिषदेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यात देशाच्या आर्थिक विकासाचा नारा देण्यात आला होता. त्यानंतर यंदा ब्रिटनच्या ऐतिहासिक राजधानीत, लंडनमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.
भारताच्या आर्थिक प्रवासातील संधी, अडथळे आणि उपाययोजना यावर आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मंथन करतील. भारताचा आर्थिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी कोणत्या धोरणांची गरज आहे, खासगी क्षेत्राची भूमिका किती महत्त्वाची आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाढता प्रभाव, तसेच जागतिक पातळीवर भारताचे स्थान कसे मजबूत करता येईल, यावर रचनात्मक संवाद होईल. यामुळे ही परिषद भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संवादातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. कारण भारत आता जागतिक पटलावर एक मोठी आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचा आर्थिक दृष्टिकोन मांडण्यासाठीची ही सुवर्णसंधी असणार आहे. जगभरातील तज्ज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि नेते यांच्या विचारमंथनातून धोरणनिर्मितीची प्रक्रिया अधिक व्यावहारिक होणार असून त्याचा फायदा देशाला होईल. भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेल्या प्रवासात अशा परिषदा नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. ही परिषद म्हणजे केवळ संवादाची संधी नसून, भारताच्या आर्थिक विश्वातील स्थान अधिक बळकट करणारी एक धोरणात्मक बाब ठरणार आहे.
चार प्रमुख परिसंवादांत अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, विकासात महिलांचे योगदान आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यांसारख्या विषयांवर मंथन होईल. आर्थिक प्रगतीचा वेध घेणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिका अधोरेखित करणाऱ्या या ‘कन्व्हेन्शन’मध्ये जगभरातील मान्यवर आपला नवा दृष्टिकोन मांडला जातो.
