तळजाई डोंगरावर रानडुकरांचा वावर प्रशासन नागरिकांचे जीव गेल्यावर लक्ष देणार का – नितीन कदम

पर्वती प्रतिनिधी :: बोपदेव घाटात नुकत्याच घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलीस, वन विभाग एकत्र आले आहेत. बोपदेव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील २२ प्रमुख टेकड्यांवर हायटेक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून याचा पायलट प्रकल्प बोपदेव घाटात सुरू झाला आहे.

यामध्ये तळजाई टेकडीचा देखील समावेश आहे; 108 एकर मध्ये पसरलेली तळजाई टेकडीवर अनेक पुणेकर वॉकिंगला येत असतात मात्र या गावठी रानडुक्कर आढळल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती पसरू लागली आहे, यावर वन विभाग व महापालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे नागरिकांची जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन कदम यांनी उपस्थित केला आहे.

रानडुक्कर हे खूप भयानक आहे याच्या धडकेत माणूस मरू शकतो एवढी ताकद रानडुक्करमध्ये आहे मात्र प्रशासन यावर काहीच तोडगा काढत नसल्याचे दिसून येत आहे.